व्हीएसआरएस न्युज कारमध्ये ऐवढ्या नोट्या मिळाल्या की पोलिसांना बॅंकमधून नोटा मोजायची मशीन मागवावी लागली. डुंगरपूर जिल्ह्यातील बिछिवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
या कारमधून ४.५ कोटी रुपये जप्त करण्यात आले. ही रक्कम हवालाशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांना आहे. DL8CA X3573 या क्रमांकाच्या गाडीत या नोटा सापडल्या. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जप्त केलेली रक्कम दिल्लीहून गुजरातला पाठवण्यात येत होती असा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र या कारमध्ये मिळालेली रक्कम मोठी असल्यामुळे पोलिसांना बॅंके मधून नोटा मोजायची मशीन मागवावी लागली. सकाळी नोटा मोजण्यात सुरुवात झाली असता संध्याकाळपर्यंत हे काम सुरुच होतं. त्यामुळे पोलिस नोटा मोजता-मोजता घामाघून झालेले बघायला मिळाले.
‘कारमध्ये सापडलेले पैसे जप्त करण्यात आले असून आरोपींची चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार ही रक्कम हवाला रॅकेटशी संबंधित आहे. सध्या आरोपींना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.,’ अशी माहिती डीएसपी मनोज सवारिया यांनी दिली आहे.