व्हीएसआरएस न्युज पुणे- पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी क्रेडिट कार्डची लाखो रुपयांची गोपनीय माहिती चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरात एका वृद्ध महिलेच्या बँक खात्यातून सायबर गुन्हेगाराने २१ लाख ११ हजार रुपये चोरले. ही घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या ६४ वर्षीय वृद्धाने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभियांत्रिकीशी संबंधित एका खासगी कंपनीत कामाला आहे. तक्रारदाराकडे क्रेडिट कार्ड होते ते त्यांनी कधीही वापरले नाही. मात्र, सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तक्रारदाराच्या बँक बचत खात्यातून 12 लाख रुपये, त्यानंतर ठेव खात्यातून 8 लाख व 80 हजार रुपये असे एकूण 21 लाख 11 हजार रुपये त्यांच्या क्रेडिट कार्डमधून ऑनलाइन काढून घेतले. याची माहिती मिळताच फिर्यादीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
Discussion about this post