व्हीएसआरएस न्युज जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील मानकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेत खाण स्फोट झाला आहे. या स्फोटात एक जवान शहीद झाला आहे.
भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुंछ जिल्ह्यातील मानकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ खाण स्फोट झाला. यात सैन्याचा एक सैनिक शहीद झाला आहे. शहीद जवानची ओळख 27 वर्षीय कमल वैद्य अशी आहे. कमल हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. या अपघातात एक जवानही जखमी झाला आहे. ज्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Discussion about this post