व्हीएसआरएस न्युज पंजाब-काँग्रेसने विश्वासाने प्रदेशाध्यक्ष पदाची माळ घातली होती त्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा आहे.
त्यांनी नुकतंच ट्विट करत हा राजीनामा जाहीर केला आहे. त्यांनी हा राजीनामा सोनिया गांधींकडे पाठवला आहे.
सुपूर्द केलेल्या राजीनाम्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, माणसाचे चारित्र्य कोसळण्याची सुरुवात ही तडजोड करण्यापासून सुरु होते. मी पंजाबच्या भविष्या आणि कल्याणाबाबत तडजोड करु शकत नाही. त्यामुळेच मी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरुन राजीनामा देतो आहे. मी काँग्रेसची सेवा करत राहिन.
Discussion about this post