व्हीएसआरएस न्युज – पिंपरी चिंचवड शहरात छठ महापर्व निमित्त अर्घ्य अर्पण करण्यासाठी विश्व श्री राम सेना सामाजिक संस्थेच्या वतीने इंद्रायणी घाटावर मर्यादित स्वरुपात गंगा आरती व छठ पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे इंद्रायणी किनाऱ्यावर प्रशासन आणि संघटनेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. छठव्रतींच्या सोयीसाठी छट घाटांवर जवळपास सर्वच साफसफाईची कामे पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी घाट बांधण्यात आले आहेत, त्या ठिकाणी छत्रवासीयांची सोय लक्षात घेऊन पूर्ण तयारी करण्यात आली आहे. सोबतच सर्व उत्तर भारतीयांनी कोरोना नियमांचे पालन करून घाटावर गर्दी करू नये असे आवाहन महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि लालबाबु गुप्ता इंद्रायणीघाट आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Discussion about this post