व्हीएसआरएस न्युज 21 ऑक्टोबर रोजी दुपारी पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर दुपारी सव्वा एक वाजता सशस्त्र दरोडा पडला होता.
5 आरोपींनी कॅशियर, बँकेच्या कर्मचारी व ग्राहकांना हातातील पिस्तुलाचा धाक दाखवून कॅशियरला हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी बँकेतील 32 लाख 52 हजार 560 रोख रक्कम, 2 कोटी 47 लाख 20 हजार 390 रुपये किमतीचे 824 तोळे 130 मि.ग्रॅ. वजनाचे सोने असे एकूण 2 कोटी 79 लाख 72 हजार 950 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम दरोडा टाकून चोरुन नेले होते. या प्रकरणातील आरोपींच्या शोधार्थ 10 पथकं रवाना करण्यात आले होते अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींकडून 2 कोटी 19 लाखाचे सोने व 18 लाखाची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. डॉलर ऊर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ, अंकुर महादेव पावळे , धोंडीबा महादु जाधव , आदिनाथ मच्छिंद्र पठारे , विकास सुरेश गुंजाळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दुपारी दीड वाजताच्या सुमारास कारमधून चार दरोडेखोर बँकेच्या आतमध्ये गेले तर त्यांचा पाचवा साथीदार गाडीमधेच थांबला होता. त्यानंतर त्यांनी पिस्तुलाचा धाकाने बँकेतील कर्मचाऱ्यांकडून 30 लाख रुपये आणि दीड कोटीचे सोन्याचे दागिने लंपास केले. दरोडा टाकल्यानंतर चोर शिरुरच्या दिशेने निघून गेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर आधी शिरुरच्या दिशेने गेले. शिरुरमधून पुढे हे दरोडेखोर अहमदनगरच्या दिशेने गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आले होते.
Discussion about this post