व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई –दोन वर्षांच्या कोरोनाच्या महामारीनंतर पुन्हा एकदा राज्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. मुंबईत प्रसिद्ध असलेला आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा पुन्हा एकदा लालबाग परिसरात विराजित झाल आहे.
तसेच, या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सव सुरू होऊन चार दिवस झाले असून, लालबागच्या राजाची दानपेटी मोजण्यात आली. त्यावेळी पहिल्या चार दिवसांत तब्बल लालबागच्या राजाच्या दानपेटीत 4 दिवसांत 1.50 कोटींचे दान जमा झाल्याची माहिती समोर येत आहे.
यंदा लालबागच्या राजाने एक नवा विक्रमच केला आहे. अवघ्या चार दिवसांतच लालबागचा राजा मंडळात एक कोटीपेक्षाही अधिकची देणगी जमा झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. चार दिवसांत तब्बल दीड कोटी रुपये इतकं भरघोस दान गणेशभक्तांनी राजाच्या चरणी अर्पण केले आहे. चार दिवसांत करोडो गणेशभक्तांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
Discussion about this post