व्हीएसआरएस मराठी न्युज –महागाईच्या झळा सोसणाऱ्या सामान्य मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरात सीनजीच्या दरात अडीच रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
त्यामुळे मुंबईत उद्यापासून सीएनजी गॅस ८७ रुपये प्रतिकिलो दराने मिळणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील.
सीएनजी दर कमी केल्यामुळे रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच सामान्य नागरिकांना देखील सीएनजी दर कपातीमुळे दिलासा मिळणार आहे. मुंबईत (Mumbai) सीएनजी दर ८९.५० रपये होता. तर उद्यापासून सीएनजी दर ८७ रुपये दराने मिळणार आहे. सीएनजीचे नवीन दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
Discussion about this post