व्हीएसआरएस मराठी न्युज -महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार काल संपला. या निवडणुकीबाबत महाराष्ट्रातील जनतेत प्रचंड उत्सुकता आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तर नागपूर शिक्षक जागेवर भाजपचे नागो गाणार (Nago Ganar) यांच्या विरोधात आघाडीचे सुधाकर अडागळे, (Sudhakar Adgale) अमरावती पदवीधर जागेवर भाजपचे रणजित पाटील (Ranjit Patil) विरूद्ध धीरज लिंगाडे, (Dhiraj Lingade) औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे (Vikram Kale) यांच्याशी किरण पाटील ( Kiran Patil) यांच्यात लढत आहे. कोकणात आघाडीचे बाळाराम पाटील (Balaram Patil) हे भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे (Dhyaneshwar Matre) यांच्यात लढत आहेत. या निवडणुकीत एकूण ८३ जण रिंगणात आहेत.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ
अर्ज मागे घेतले – ६
रिंगणातील उमेदवार – १६
प्रमुख लढत –
१. सत्यजित तांबे (अपक्ष) भाजपचा पाठिंबा
२. शुभांगी पाटील (अपक्ष) mva चा पाठिंबा
मराठवाडा शिक्षक मतदारसंघ
अर्ज मागे घेतले – १
रिंगणातील उमेदवार – १४
प्रमुख लढत –
१. विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस), २. प्रदीप सोळुंके (राष्ट्रवादी बंडखोर), ३. प्रा. किरण पाटील (भाजप), ४. कालिदास माने (वंचित बहुजन आघाडी), ५. सूर्यकांत विश्वासराव (मराठवाडा शिक्षक संघ)
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ
अर्ज मागे घेतले – ५
रिंगणातील उमेदवार – २२
प्रमुख लढत – १. नागो गाणार (शिक्षक परिषद, भाजप समर्थित), २. राजेंद्र झाडे (शिक्षक भारती), ३. सुधाकर अडबाले (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, मविआ समर्थित)
अमरावती पदवीधर मतदारसंघ
अर्ज मागे घेतले – १०
रिंगणातील उमेदवार – २३
प्रमुख लढत – १. डॉ. रणजित पाटील (भाजप), २. धीरज लिंगाडे (काँग्रेस), ३. अनिल अमलकार (वंचित बहुजन आघाडी),
४. डॉ. गौरव गवई (बहुजन भारत पार्टी)
कोकण शिक्षक मतदारसंघ
अर्ज मागे घेतले – ५
रिंगणातील उमेदवार – ८
प्रमुख लढत – १. ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप), २. बाळाराम पाटील (अपक्ष)
Discussion about this post