मुंबई | (व्हीएसआरएस न्यूज) | मुंबईतील बीकेसी येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारने अन्य एका कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून तर अन्य दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, विश्वास अट्टावर आरोपी चालकाचं नाव असून पोलीसांनी त्याला अटक केली आहे. तसेच गाडी चालवताना तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तिथून वेगाने पळ काढताना त्याने हॉटेल ट्रायडन्ट येथील मार्गावरून विरुद्ध दिशेने जात समोरून येणाऱ्या एका कारला धडक दिली.
भीषण अपघातात स्वाती चौधरी नावाच्या एका साडेतीन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे काका ओम चौधरी (25) आणि त्यांचे मित्र विनोद यादव (46) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Discussion about this post