पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | मारहाणीत तक्रारदार यांना मुक्कामार लागला आहे. जीमला निघालेल्या एका व्यक्तीला अनोळखी चौघांनी अडवून विनाकारणच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात सादीक शेख (वय ३९) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी चार व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. कोंढवा येथील मलिकनगर येथे रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. तक्रारदार संशयितांना ओळखत नाहीत.
दरम्यान, ते रात्री साडे नऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुचाकीने जीमला निघाले होते. चौघे विनाकारण शिवीगाळ करत होते. त्यातील एकाने लाकडी दांडक्याने त्यांच्यावर हल्ला केला. तर, तिघांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीररित्या जखमी केली. दरम्यान, पोलिसांकडून आता या अनोळखी संशयितांचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Discussion about this post