पिंपरी चिंचवड | (व्हीएसआरएस न्यूज) | पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक नगरी चिखली येथे दरवर्षी प्रमाणे विश्व श्री राम सेनेच्या वतीने श्री रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. प्रभु श्रीराम जयंतीनिमित्त आज अंबिका भवनात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात महिलांची संख्या अधिक होती. प्रभु श्रीरामचे बालपण पाहण्यासाठी, त्यांच्या हाताने पाळणा डोलवण्यासाठी, आरती करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. विश्व श्री राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ लालबाबू गुप्ता, श्यामबाबू गुप्ता, प्रमोद गुप्ता, बच्चा गुप्ता आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रभु श्रीराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरात हा सर्वात मोठा श्री रामनवमी जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
या मान्यवरांनी प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतले
रामचरितमानस, रामलला जन्मोत्सव आणि आरती, सोहरगीत, महायज्ञ, महाप्रसाद, पालखी, शोभायात्रेचे २४ तास अखंड पठण करून श्री रामजन्मोत्सव कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज (श्यामजी महाराज) आमदार महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे, माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे, कुंदन गायकवाड, साधना माले, दक्षिण चित्रपट अभिनेते तथा नेताजी सुभाषचंद्र बोस पक्षाचे अध्यक्ष रंगाशेठ, स्वामी दत्तानंद महाराज, गोरक्षक मिलिंद ई. , कुणाल साठे (विश्व हिंदू परिषद), मनोज जरेकर, अशोक महाराज पवार, लटके महाराज, चिखली पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.
Discussion about this post