व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्याचा सपाटाच लावला आहे. शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. डोके वर काढू पहाणार्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का ( महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्यानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
आतापर्यंत त्यांनी शहरातील अनेक गुन्हेगारी टोळ्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात पदभार स्वीकारल्यानंतर नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरीरा विरुद्ध व मालमत्ता विरुद्ध गुन्हे करणाऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या मोक्का कारवाईमध्ये पुणे शहरातील कुप्रसिद्ध टोळी मधील गुन्हेगारांचा समावेश आहे. यामध्ये बंडू आदेकर, निलेश घयवाळ, सचिन पोटे, बापू नायर, सुरेश ठोंबरे, महादेव आदलिंगे, अक्रम पठाण यांचा समावेश आहे.
लोन ॲपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केलेल्या टोळी विरोधात गुप्ता यांनी नुकतीच मोक्काची कारवाई केली. आरोपी धीरज पुणेकर याच्यासह 8 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.
Discussion about this post