-ओम साई फाउंडेशन व सनराइस् मेडिकल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
पिंपरी | (व्हीएसआरएस न्यूज) | H3N2 या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याविषयी जनजागृती करण्यासाठी ओम साई फाउंडेशन व सनराइस् मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमातून पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या शाळेत प्राथमिक विद्यार्थ्यांना माहिती पत्रक व मास्कचे वाटप करण्यात आले.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्याविषयी माहिती पत्रक व मास्क देऊन या आरोग्यविषयक काळजी घ्यावी याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले की ,मागे कोरोना काळामध्ये कोरोना या विषाणूमुळे आपली खूप मोठी आर्थिक व जीवित हानी झाली आहे. संसर्गजन्य रोगाची लागण टाळण्यासाठी प्रत्येकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
यावेळी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे,रवी खोकर,प्रफुल उतखडे,मुख्याध्यापक साधना वाघमारे,शिक्षक संतोष वाघमारे,करुणा परबत,भारती वरने,शेजवळ सुनीता,नैना रत्नपारखी,जयश्री लांघी,अलका आगवे,संगीता आव्हाड,नामदेव चौगुले,पंकज चौधरी,सुभाष गवारी,मंगल शेळकंदे,मनीषा घोरपडे,मुक्ता असवले,मनीषा दरेकर,योगिता परबत आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Discussion about this post