व्हीएसआरएस मराठी न्युज –
केंद्र सरकारने काँग्रेसवर आतापर्यतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राजीव गांधी फाउंडेशनचे विदेशातून फंड स्वीकारण्याचे लायसन्स रद्द केले आहे.
राजीव गांधी फाउंडेशनवर विदेशी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. म्हणूनच केंद्र सरकारने राजीव गांधी फाऊंडेशनचा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA) परवाना रद्द केला आहे.
राजीव गांधी फाउंडेशन (RGF) ही गांधी कुटुंबाशी संबंधित संस्था आहे. फाउंडेशनवर विदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचे समोर आले. गृह मंत्रालयाच्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जुलै 2020 मध्ये गृह मंत्रालयाने ही चौकशी समिती स्थापन केली होती.
याची स्थापना 1991 मध्ये झाली, RGF आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला आणि मुले, दिव्यांगांना आधार यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करते. 1991 ते 2009 या काळात फाऊंडेशनने शिक्षणाच्या विकासावर भर दिला होता. अशी माहिती फाउंडेशनच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
Discussion about this post