पिंपरी- चिंचवड | (व्हीएसआरएस न्यूज) | सर्वसामान्य महिलांच्या वतीने भाजपाच्या महिला आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि उमा खापरे यांनी आज राज्यसरकार चे आभार मानले आहेत. राज्यशासनाने महिलांना एसटी तिकिटाच्या दरात पन्नास टक्के सवलत दिली आहे. यानंतर एसटी प्रवासात महिलांची संख्या वाढली असल्याचं देखील समोर आलं आहे.
भाजपाच्या चिंचवड विधानसभे च्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी एसटी ने लोणावळ्यापर्यंत प्रवास केला. सकाळी साडे नऊ च्या सुमारास दोन्ही महिला आमदार पिंपरीच्या वल्लभ नगर बस स्थानकात आल्या. तिथून शिरूर दादर एसटी ने प्रवास सुरु केला. यावेळी भाजपाच्या महिला कार्यकर्त्या देखील महिला आमदारांच्या सोबत होत्या. त्यामध्ये माजी महापौर उषा ढोरे, स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, निर्मला कुटे, सविता खुळे, वैशाली जवळकर, माधवी राजापुरे, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, माजी शहराध्यक्षा शैला मोळक, दिपाली धानोरकर, सुप्रिया चांदगुडे आदींचा समावेश होता.
Discussion about this post