व्हीएसआरएस मराठी न्युज –पोटनिवडणुकांचे बिगुल वाजले असून केंद्रीय निवडणूक आयोगाने 6 राज्यांतील 7 जागांवर पोटनिवडणूक (By-election) जाहीर केली आहे. या सर्व जागांवर 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासह, बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज, हरियाणातील आदमपूर, तेलंगणा, मनुगोड, उत्तर प्रदेशातील गोला गोकरनाथ आणि ओडिशातील धामनगर (राखीव) या जागांवर निवडणुका घेण्यात येणार आहे.
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे नेमके काय होणार? याचे उत्तर मिळण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. कारण एकीकडे चिन्हाची लढाई सुरु असतानाच निवडणूक आयोगाने आज अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीचा फॉर्म भरतानाच ठाकरे गटाकडे धनुष्यबाण राहणार की, त्यांना धनुष्यबाण गमवावे लागणार याचे उत्तर मिळणार आहे.
Discussion about this post