पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | बस नीट चालविता येत नाही का? असं म्हणत एका कारचालकाने पीएमपी बसचालकास मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना पुण्यातील मुंढवा चौकाजवळ घडली.
तर भाजीपाला विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला बांबूने मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार वारजे एनडीए रस्त्यावर घडला. आज पुण्यात या दोन मारहाणीच्या घटना घडल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
बस नीट चालविता येत नाही का, असं म्हणत एका कारचालकाने पीएमपी बसचालकास शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना मुंढवा चौकाजवळ घडली. याप्रकरणी पीएमपी बसचालकाने फिर्याद दिली असून मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Discussion about this post