व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -आगामी १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि भूपेश बघेल यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
भूपेश बघेल आणि राजीव शुक्ला यांना हरयाणाची तर, पवन कुमार बन्सल आणि टी. एस. सिंह देव यांना राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे. हरयाणा, राजस्थान आणि महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन हे हरयाणातून पक्षाचे उमेदवार आहेत.
भाजप आणि महाविकास आघाडीकडून मतांची बेरीज सुरु असून, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदार आणि समर्थक आमदारांची बैठक बोलावली आहे.
आज (६ जून) सायंकाळी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना आमदार, समर्थक लहान पक्ष, अपक्ष आमदार उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
Discussion about this post