व्हीएसआरएस मराठी न्युज –दिल्ली: दि -५ आँगष्ट २२ (शुक्रवार)- वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने देशव्यापी निदर्शन सुरू केली आहेत. याच निदर्शनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून प्रियांका गांधींनी रस्त्यावर धरणं आंदोलन सुरू केलय.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी काँग्रेस मुख्यालयाजवळील सुरक्षा कवच तोडून बॅरिकेडवरुन उडी मारत पुढे जात होत्या. मात्र त्यांना तिथंच थांबवण्यात आल्यानं त्या रस्त्यावरच ठाण मांडून बसल्या.
तर दुसरीकडे राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसने एक व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका बसमध्ये दिसत असून त्यांच्यासोबत खासदार इम्रान प्रतापगढीही दिसतायत.
काँग्रेस मुख्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून प्रियांका गांधी रस्त्यावर बसलेल्या दिसत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी काही खासदारांना ओढून मारहाण केल्याचा आरोप राहुल गांधींनी यावेळी केलाय.
Discussion about this post