पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | चालक पदाची परिक्षा २६ मार्च रोजी तसेच शिपाई पदाची परिक्षा २ एप्रिल रोजी होणार असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परिक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. शहर पोलीस दलातील भरती प्रक्रिया सुरू आहे. शिवाजीनगर मुख्यालयाच्या मैदानावर चाचणी नुकतीच पार पडली. दोन्ही पदांसाठी तब्बल ७३ हजार २४२ उमेदवारांनी अर्ज केले होते.
त्यापैकी ४६ हजार ४७५ उमेदवारांनी मैदाणी चाचणीत सहभाग घेतला होता. या चाचणीत मात्र चालक पोलीस शिपाई पदासाठी ६७९ उमेदवार पात्र आहेत. तर पोलीस शिपाई पदासाठी २० हजार ६३१ उत्तीर्ण झाले आहेत. चाचणी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आता लेखी परिक्षांची तयारी सुरू करण्यात आली आहे.
त्यानूसार चालक पोलीस शिपाई पदाची लेखी परिक्षा २६ मार्च रोजी शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अॅंड कॉमर्स येथे होणार आहे. तसेच, शिपाई पदाची परिक्षा २ एप्रिल रोजी याच ठिकाणी होणार आहे. संबंधित माहिती पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Discussion about this post