पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी (२५ आणि २६ मार्च) कार्यालय सुरू ठेवण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. कर्मचाऱ्यांनी १४ ते २० मार्च या कालावधीत केलेल्या संपामुळे आर्थिक कामकाज ठप्प झाले होते. राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुंबईच्या शिक्षण निरीक्षकांना या संदर्भातील सूचना गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या.
आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये मंजूर तरतूद, पूरक मागणीपत्राद्वारे मंजूर तरतूद आणि सुधारित अंदाजपत्रकामध्ये नमूद केलेली तरतूद १०० टक्के उपलब्ध होणार आहे.
Discussion about this post