व्हीएसआरएस मराठी न्युज -नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस नेते (Congres) राहुल गांधी यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली.
दुसऱ्या दिवशी तब्बल 10 दहा तास चौकशी केल्यानंतर राहूल गांधींची (Rahul Gandhi) सुटका केली. आजही गांधी यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल यांच्याबरोबरच ईडीकडून प्रियांका गांधी यांनाही चौकशीसाठी (ED Summons) बोलवण्यात येणार असल्याची चिन्हं आहे.
1938 मध्ये काँग्रेसने असोसिएट जर्नल्स लिमिटेडची (AJL)स्थापना केली. असोसिएट जर्नल्स लिमिटेड अंतर्गत नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आहे. 2012 साली भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला होता की, काही काँग्रेस नेत्यांनी (राहुल-सोनिया गांधींव्यतिरिक्त) यंग इंडिया लिमिटेड मार्फत असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे चुकीच्या पद्धतीने अधिग्रहण करण्यात आले आहे. 2000 कोटींची दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसची इमारत ताब्यात घेण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता.
गांधी कुटुंबाने काँग्रेस पक्षाचा निधी वापरून एजेएल मिळवल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे. स्वामींच्या आरोपांवर विश्वास ठेवायचा असेल, तर असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची 2000 कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्याचा त्यांचा उद्देश होता.
2008 मध्ये नॅशनल हेराल्ड बंद होत असताना काँग्रेसचे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडवर 90 कोटी रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज पुन्हा वृत्तपत्र चालवण्यासाठी देण्यात आले. पण वृत्तपत्राचे चालवणे शक्य झाले नाही. आणि एजेएलला हे कर्ज काँग्रेसला परत करता आले नाही.
Discussion about this post