व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभियांत्रिकी, वास्तुकला, औषधनिर्माणशास्त्र आदी विद्याशाखांच्या पुढील वर्षांचे वेळापत्रक जाहीर केले.
त्यानुसार बहुतांश अभ्यासक्रम जुलै, ऑगस्टमध्ये सुरू करण्यात आले असून, यंदा परीक्षांचे निकालच उशिरा जाहीर झाल्याने पहिले सत्र पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांची धावपळ होणार असल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाने विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षापासून पुढील वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले.
बहुतांश अभ्यासक्रम जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आले आहेत. परंतु, या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा उशीरा झाल्याने निकालही उशीरा जाहीर झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची महाविद्यालये जवळपास महिनाभर उशीरा सुरू झाली. या सर्व अभ्यासक्रमांचे पहिले सत्र नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये संपणार आहे.
Discussion about this post