व्हीएसआरएस मराठी न्युज –शिंदे आणि फडणवीस सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता रानातील तरुणांना पोलीस होण्याचा गोल्डन चान्स मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर उद्या म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत आर सादर करण्यातही मुदत देण्यात आली होती.
मात्र आता हे मुदत वाढवून 15 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं ट्विट केली आहे. राज्यात तब्बल अठरा हजार पोलिसांची भरतीची घोषणा झाल्यानंतर सर्व तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 9 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज [प्रक्रिया सुरु झाल्यापासून अनेक तरुणांनी अर्ज केले आहेत. मात्र काही दिवसांपासून उमेदवारांना फॉर्म भरण्यात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता.
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे.
यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.
Discussion about this post