पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | अपघात कात्रज-कोंढवा रस्त्यावरील बालाजी हॉटेलजवळ रात्री साडे अकराच्या सुमारास घडला. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जागीच ठार ) झाला. रोहन काळुराम इंगळे (वय २२, रा. खडकीनाला) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दुचाकी चालक प्रभात आंबेकर (वय २३) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक चालक सुनिलकुमार हमुमंत गौड (रा. कर्नाटक) याला अटक केली आहे. याबाबत मित्र प्रभात संतराम आंबेकर याने तक्रार दिली आहे.
तक्रारदार व त्याचा मित्र रोहन हे कात्रजकडून कोंढवा रस्त्याने जात होते. रात्री साडे अकराच्या सुमारास भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दोघेही खाली पडून जखमी झाले. पण, गंभीर मार लागल्याने रोहन याचा मृत्यू झाला. तर, प्रभात हा जखमी झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Discussion about this post