व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.
निम्हण हे 1999 ते 2014 अशी 15 वर्षे शिवाजीनगर मधून आमदार होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते.
2014 मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले होते.
यावेळी त्यांची शिवसेनेच्या शहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
संध्याकाळी नऊ वाजता पाषाण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समजत आहे.
Discussion about this post