व्हीएसआरएस मराठी न्युज – डॉ लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शन खाली आकुर्डी येथील विश्व श्रीराम सेनाच्या वतीने देहू ते पुणे पालखी मार्गावर आषाढी वारीत श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयातील वारकऱ्यांसाठी फिरता मोफत दवाखाना ही सुविद्या उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
आरोग्यमंच अध्यक्ष अक्रम शेख यांनी ही माहिती दिली. 20 जुन 2022 रोजी संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान होणार आहे. देहू ते पुणे मार्गावर या पालखी सोहळयातील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे.
यंदाही वारक-यांना रुग्णवाहिका सेवा पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालखी मार्गावर मोफत तपासणी व औषधोपचार करणाऱ्या संस्थांना औषधांची मदत केली जाणार आहे. ज्या दानशूर व्यक्तिंना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी अक्रम शेख यांच्याशी 9767763378 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.