व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाय. सी. एम. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृतदेह बदलल्या गेल्याचा आरोप करत नातेवाईकांनी प्रचंड तोडफोड करतं गोंधळ घातला आहे. काही वेळा पूर्वीच ही घटना घडली असून संबंधित मयत व्यक्तीच्या नातेवाईकानी दिलेल्या माहिती नुसार पिंपरी शहरातील दापोडी परिसरात स्नेहलता गायकवाड नामक वृद्ध महिलेच्या अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला होता.
त्यांच्या मृतदेहाच शव विच्छेदन करण्यासाठी मृतदेह YCM रुग्णालयात आणला होता. मात्र शव विच्छेदनां नंतर मृतदेह नेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना धक्का बसला कारण तो मृतदेह दुसऱ्याच महिलेचा असल्याचे त्यांना कळालं. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी नातेवाईक हॉस्पिटलचे डीन डॉक्टर राजेश वाबळे यांच्याकडे गेले, मात्र त्यांनी उडवा उडविचे उत्तरं दिले आणि त्यानंतर तोडफोड केलीय.
एका महिलेच्या मृतदेहाची चक्क अदलाबदल केली असून दुसऱ्या महिलेचा मृतदेह आपला समजुन संबंधीत नातेवाईकांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करुन टाकले आहेत. परंतु आपल्या नातेवाईकाचे शेवटच्या क्षणी तोंड देखील पहायला न मिळाल्याने संतप्त झालेल्या मयत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली आहे.
हा सर्व प्रकार बुधवार (ता. १९) रोजी सकाळच्या वेळे सुमारास रुग्णालय परीसरात घडला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस मात्र या घटनेचा गंभीर तपास करीत आहेत.
स्नेहलता अशोक
गायकवाड (वय- ५७ वर्ष, रा. दापोडी) असे या महिलेचे नाव आहे.
सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहलता गायकवाड या आपल्या कुटुंबा समवेत दापोडी परीसरात राहत होत्या. मंगळवारी सायंकाळी त्यांच्या अंगावर भिंत कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना तातडीने औंध येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्नेहलता यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना जवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान स्नेहलता यांचा मृत्यू झाला. स्नेहलता यांच्या जाण्याने गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
मयत स्नेहलता गायकवाड यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी त्यांचा मृतदेह पिंपरीतील यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयाच्या शवविच्छेदन पाठविण्यात आला. गृहात
मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मयत स्नेहलता गायकवाड यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी इतर आणखी दोन महिलांच्या
मृतदेहाचे देखील शवविच्छेदन करण्यात आले होते. या दोन महिलांचे मृतदेह देखील तेथे ठेवण्यात आले होते.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गायकवाड मयत स्नेहलता यांच्या नातेवाईकांना त्यांचे अंतिम दर्शन घेतले. आमचे नातेवाईक गुजरात येथुन येत आहेत. त्यामुळे आम्ही दुपारी अंत्यसंस्कार करणार असल्याचे
सांगुन गायकवाड कुटुंबातील सदस्य निघुन गेले.
बुधवार (ता. १९) सकाळी पुन्हा गायकवाड कुटुंबातील सदस्य शवविच्छेदन गृहात आले आणि त्यांनी मयत स्नेहलता गायकवाड यांचा मृतदेहाची खात्री केली.
अकरा वाजता गायकवाड कुटुंबातील सदस्य मयत स्नेहलता गायकवाड यांचा मृतदेह विधी करीता ताब्यात घेण्यासाठी आले असता त्यांना धक्काच बसला. हा मृतदेह आपली आई मयत स्नेहलता गायकवाड यांचा नसल्याचे मुलगा रोहन गायकवाड याने सांगताच रुग्णालय परीसरात एकच गोंधळ उडाला.
संतप्त झालेले गायकवाड कुटुंब सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी आपला मोर्चा रुग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी यांच्या कॅबीनकडे
वळवला आणि रुग्णालयाची तोडफोड करण्यास सुरवात केली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्यासह पोलीस फौज फाट्याने घटनास्थळी धाव घेतली. गायकवाड कुटुंबीयांचे नातेवाईक यांच्याशी चर्चा करुन तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन पोलीसांनी दिल्यानंतर तणाव निवळला आहे.
अशा प्रकारच्या घटनांमुळे यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या कारभारा संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत तर दुसरीकडे रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
Discussion about this post