व्हीएसआरएस मराठी न्युज -राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आज विदर्भात दाखल झालीय. आणि या यात्रेत १८ नोव्हेंबरला होणाऱ्या सभेत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी सहभागी होणार आहेत.
विशेष म्हणजे या सभेचं निमंत्रण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाही देण्यात आलंय. शेगावमध्ये ही सभा होणार आहे. या सभेत सोनिया गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय. या सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहिले तर या निमित्तानं महाविकास आघाडीतील ते सर्वात मोठं शक्तीप्रदर्शन ठरेल.
येत्या 18 तारखेला खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे येणार आहे. शेगाव-बाळापूर मार्गावरील जवळा-वरखेड गावाजवळील या मार्गावर विष्णुपंत हरिभाऊ कानडे या ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याच्या चार एकर शेतात 20 फूट उंच विठ्ठलाची मूर्ती उभारुन त्याभोवती एक हजार वारकरी रिंगण सोहळा करुन राहुल गांधी यांचं स्वागत करणार आहेत. यावेळी राहुल गांधी हे देखील वारकऱ्यांचा वेष परिधान करुन त्यांच्यासोबत पावलं टाकत रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या सोहळ्यासाठी परिसरातील वारकरी आणि काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते उत्साहित आहेत.
Discussion about this post