व्हीएसआरएस मराठी न्युज –पुणे परिमंडळांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पुणे परिमंडळांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pune) येथे स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स या पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी एकूण 45 जागांसाठी भरती होणार असून यासाठीचे पुणे आहे. दरम्यान, पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे.
स्त्रीरोगतज्ज्ञ – 70 वर्षे
बालरोगतज्ञ – 70 वर्षे
भूलतज्ज्ञ – 70 वर्षे
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
यासाठी अर्ज करण्याचा शुल्क हा रु. 150/- इतका आहे तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सुरु होण्याची तारीख ही 11 ऑक्टोबर 2022 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे. अधिक माहितीसाठी www.pcmcindia.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
महत्वाची कागदपत्रे
वयाचा पुरावा
पदवी/पदवीका प्रमाणपत्र
शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (as applicable)
शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये National Health Mission मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
निवासी पुरावा
जातीचे प्रमाणपत्र
उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटो
असा करा अर्ज
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक उमेदवारांना 11 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करता येतील.
खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
तसेच अर्ज ऑनलाईन भरताना डिमांड ड्राफ्टचा फोटो, बँकेचे नाव व डिमांड ड्राफ्टच्या मागच्या बाजूला पदाचे नाव, अर्ज क्रमांक, उमेदवाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर अचूक लिहावे.
सदर अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.
Discussion about this post