पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | पुणे शहरात मुख्य पेठांच्या परिसरासह डेक्कन, पाषाण, सूस रस्ता, सहकारनगर, बिबवेवाडी, वारजे, कोंढवा, कोथरूड आदी भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शहरात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी अचानक पाऊस यामुळे पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात पाऊस अनुभवायला मिळाला.
पुढील पाच दिवस राज्यातमुसलाधार पाउस होणार असल्याचा अंदाज हवामान्खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यातच आज सायंकाली पाच वाजल्या पासूनच अनेक जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली. आचानक आलेल्या पावसामुले पुनेकरांची य्काच धाव्पल उडाली. राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा या ठिकाणी देखील पाऊस झाला. तर नंदुरबारसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पावसाचा तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
Discussion about this post