व्हीएसआरएस मराठी न्युज –53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा साजरा केला जाणार आहे. देश विदेशातील कलाकार ,दिग्दर्शक, आणि चित्रपटप्रेमींनी गोव्यात हजेरी लावली आहे.
गोव्यातील प्रमुख चौकात तसेच राजधानी पणजी येथे भव्य सजावट करण्यात आली आहे. आज 20 नोव्हेंबर रोजी शाम मुखर्जी स्टेडियमवर अभिनेता अजय देवगण,अभिनेता सुनील शेट्टी,अभिनेता प्रभू देवा यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे.
इफ्फी’ची (IFFI) चर्चा आहे. आजपासून भारतातील या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे.
53 वा गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ खूप खास असणार आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या बहुचर्चित ‘दृश्यम 2’चे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. तसेच एसएस राजामौलींचा ‘आरआरआर’ आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘अभिमान’ हा सिनेमादेखील प्रेक्षकांना महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पाहता येणार आहे.
Discussion about this post