व्हीएसआरएस मराठी न्युज -रविवारी, 19 मार्च रोजी पद्मा लक्ष्मी या ‘बार कौन्सिल ऑफ केरळ’ मध्ये नोंदणी केलेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर वकील ठरल्या. लक्ष्मी व्यतिरिक्त, केरळच्या बार कौन्सिलमध्ये आणखी १५०० लॉ ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर न्यायाधीश बनलेल्या जोयिता मंडलनंतर पद्मा लक्ष्मीच्या या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. मंडल यांची २०१७ मध्ये पश्चिम बंगालमधील इस्लामपूर येथील लोकअदालतीमध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.
२०१८ च्या सुरुवातीला, ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या विद्या कांबळे यांची नागपूर, महाराष्ट्र येथील लोकअदालतीमध्ये सदस्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच वर्षी, देशाला स्वाती बिधान बरुआ रुपात तिसरे ट्रान्सजेंडर न्यायाधीश मिळाले ज्या मूळच्या गुवाहाटीच्या आहेत.
Discussion about this post