व्हीएसआरएस मराठी न्युज -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेत ही मागणी ठेवली आहे, याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, खालच्या सभागृहामध्ये आमचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची निवड झालेली आहे.
त्यामुळे वरच्या सभागृहात आमचा विरोधी पक्ष नेता व्हावा ही आमची मागणी राहणार आहे. आमचे नेते आणि सीएलपी बाळासाहेब थोरात हे या सगळ्या गोष्टींबाबत दोन्ही पक्षांसोबत आणि नेत्यांसोबत चर्चा करतील, अशी प्रतिक्रिया यावेळी नाना पटोले यांनी दिला आहे.
गेल्या सरकारमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद हे भाजपकडे होते. प्रवीण दरेकर हे भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून खिंड लढवत होते. आता सरकार बदलल्यानंतर सर्वात आधी या पदावर शिवसेनेने दावा केला, त्यासाठी शिवसेना नेते अनिल परब यांचे नाव ही चर्चेत आले. त्यानंतर राष्ट्रवादीने ही या पदावर दावा करत एकनाथ खडसे यांचे नाव चर्चेत आलं. तर आता नाना पटोले यांनी मागणी ठेवल्याने काँग्रेस कडून कुणाचं नाव पुढे येणार हेही पाहणे तितकच महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसकडून अजून कोणतेही नाव जाहीर करण्यात आलं नाही .मात्र लवकरच त्याबाबत ही माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे.
Discussion about this post