व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -महागाईच्या झळा वाढतच चालल्या असून महानगर गॅस कंपनीने सीएनजी दरात किलोमागे 6 रुपये आणि घरगुती पाईप गॅसच्या दरात 4 रुपयांची वाढ केली असून मंगळवारमध्यरात्री पासूनच ती लागू होणार आहे.
बुधवारी मध्यरात्रीपासूनच सीएनजी किलोमागे 86 रुपये तर घरगुती पाईपचा (पीएनजी) दर 52.50 रुपये इतका होणार आहे.
सीएनजीमुळे पेट्रोलच्या दराच्या तुलने 44 टक्के बचत होत असल्याचे महानगर गॅस कंपनीने म्हटले आहे. डोमेस्टिक पीएनजीचा सध्याचा दर डोमेस्टिक एलपीजीपेक्षा कमी असल्याचे महानगर गॅस लिमिटेड कंपनीने म्हटले आहे.
Discussion about this post