व्हीएसआरएस मराठी न्युज -बारावी पाठोपाठच दहावीचा निकालाची प्रतिक्षा संपली असून उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल संकेतस्थळावर घोषित केला जाईल असे घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
मंडळाकडून 20 जून पर्यंत निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते आणि त्यानुसार उद्या म्हणजे 17 जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल.
१७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत दिली आहे.
www.mahresult.nic.in आणि http://sscresult.mkcl.org व https://ssc.mahresults.org.in
Discussion about this post