व्हीएसआरएस मराठी न्युज –राज्यात गोवर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरण व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत.
गोवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, राज्यात गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. रविवारी संशयित गोवर रुग्णांची संख्या 10 हजार 544 वर पोहोचली आहे. तर गोवरची लागण झालेल्यांची संख्या 658 वर पोहोचली आहे.
गोवरची लागण झालेल्या मुलांना किमान सात दिवसांसाठी विलगीकरणात ठेवावं, असे निर्देश टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत. यासाठी रुग्णालयीन व्यवस्था करण्याचे निर्देही टास्क फोर्सनं दिले आहेत. त्याचप्रमाणे कुपोषित बालकांना गोवर आजाराची लागण झाली असेल, तर त्यांची अधिक काळजी घेणं आवश्यक असतं. अन्यथा त्यांच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करून या बालकांना आवश्यक पोषण आणि जीवनसत्त्व ‘अ’चा डोस द्यावा, असे निर्देशही टास्क फोर्सनं प्रशासनाला दिले आहेत.
सुरुवातीला तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे आढळतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामध्ये मुलं दगावण्याची सुद्धा भिती असते.
Discussion about this post