व्हीएसआरएस मराठी न्युज मावळ-मावळ भागात अक्ट्रोसिटी (अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती) नुसार गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. जमीन प्रकरण असो अथवा आपसी वाद असो. जातीचा आधार घेत एकमेकांना जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी अॅक्ट्रोसिटीचे गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, अशा प्रकरणांचा पोलीस सखोल तपास करीत आहेत.
मावळ भागाचे लोकप्रिय आमदार सुनिल (आण्णा) शेळके यांचे बंधु आणि मेहुणे यांच्यावर देखील जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी अॅक्ट्रोसिटी गुन्हा नोंद झाला आहे. यामुळे मावळ परीसरात एकच खळबळ उडाली आहे. आता हे राजकारण आहे की, आणखी काही.. खरच असा प्रकार घडला आहे का ? या बाबत पोलीस कसून तपास करीत आहेत.
१) सुधाकर शेळके आणि २) मॉन्टी दाभाडे (दोघेही राहणार तळेगाव दाभाडे ता. मावळ, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रविण सिद्धार्थ ओव्हाळ (वय- ३६ वर्ष, रा. फ्लॅट नं. १, विंग झेड, चिंतामणी मोरेश्वर सोसायटी, वराळे, ता. मावळ, जि. पुणे, मुळगाव जांभुळ, मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.
हि घटना शनिवार (ता. १०) सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या समोरील सर्व्हिस रोड (लिंब फाटा) येथे घडली होती.
दुसऱ्या प्रकरणामध्ये १) किशोर भाऊ आवारे आणि मिलिंद अच्युत (दोघेही राहणार – तळेगाव
दाभाडे, ता. मावळ, पुणे) या दोघांवर जि. जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी संदिप संजय सदावर्ते (वय- ३४ वर्ष, रा. घर नं. ६०, म्हाडा कॉलनी, हरणेश्वर हॉस्पिटल समोर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रविण ओव्हाळ हे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या समोरील सर्व्हिस रोड (लिंब फाटा) येथे शनिवार (ता. १०) रोजी सकाळी साडे
दहा वाजण्याच्या सुमारास थांबले असताना आमदार बंधु सुधाकर शेळके आणि मॉण्टी दाभाडे यांनी प्रविण ओव्हाळ यांना जाती वाचक शिवीगाळ करुन धमकी दिली आहे. म्हणुन हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या प्रकरणात रविवार (ता. ११) रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या आवारातील कॅन्टीनच्या बाजुला (पार्किंगमध्ये) सार्वजनिक ठिकाणी फिर्यादी संदिप सदावर्ते हे थांबले असताना आरोपी किशोर आवारे आणि मिलिंद अच्युत यांनी अपमान करण्याच्या उद्देशाने त्यांना जातीवाचक
या दोन्ही प्रकरणाचा
शिवीगाळ केली आहे. तपास सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट करीत आहेत.
निवडणुक तोंडावर खोटे गुन्हे दाखल – सुधाकर शेळके
नगर परीषद निवडणुक जवळ आली आहे. त्यामुळे काही मंडळी राजकिय बदनामी करण्याच्या हेतुने आमच्यावर खोटे नाटे आरोप करीत आहेत. अशा कट कारस्थानांना आम्ही भीक घालीत नाही. राजकिय आकसापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करीत आहेत.
लवकरच सत्य समोर येईल.
Discussion about this post