व्हीएसआरएस मराठी न्युज –एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती दिली.
यूपीएससीच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता , त्या जागी 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं होतं. अलका टॉकीज चौकात या एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त होता.
१३ जानेवारी रोजी या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आज या विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन केले. या आंदोलनाच्या ठिकाणी भाजप नेते अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर उपस्थित होते. गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले होते.
Discussion about this post