व्हीएसआरएस मराठी न्युज –अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा आज निकाल. ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष लढतीत कुणाची बाजी? मतदानाची टक्केवारी, पडद्यामागील घडामोडींमुळे धक्कादायक निकाल लागणार?
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी 3 नोव्हेंबरला मतदान झालं होतं. याची मतमोजणी आज होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Discussion about this post