व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-कोंढवा येथील कौसरबाग येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( पीएफआय) मुख्य कार्यालयावर आज सकाळपासून एनआयए ने छापेमारी सुरू केली आहे.
एनआयए आणि ईडीने टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याप्रकरणी देशभरातील पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. रात्री उशिरा हे छापे टाकण्यात आले. आज सकाळी पुण्यातील कोंढवा येथील कौसरबाग येथील पीएफआयच्या मुख्य कार्यालयावर छापेमारी करत काही प्रिंटर प्रकारच्या वस्तू जप्त केल्या आहेत. पीएफआयचे अध्यक्ष ओमा सलाम, राष्ट्रीय सचिव यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहे. सुरक्षेसाठी सीआरपीएफची तुकडी देखील दाखल झाली आहे.
आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादविरोधी ऑपरेशनमध्ये, एनआयएने दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये सामील असलेल्या लोकांच्या परिसराची देशभरात झडती घेतली. तसेच १०० हुन अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. एनआयए आणि ईडीने टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याप्रकरणी देशभरातील पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. रात्री उशिरा हे छापे टाकण्यात आले.
आजपीएफआयचे टेरर फंडींग, संघटनेतील सुरू असलेली ट्रेनिंग या सर्व बाबींविषयी चौकशी करण्यासाठी पुण्यातील कोंढवा येथे असणाऱ्या कार्यालयावर टाकले छापे आहे, अशी माहिती मिळत आहे. तसेच सुरक्षेसाठी सीआरपीएफची तुकडी देखील दाखल झाली आहे. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या पुण्यातील कोंढवा भागातील मुख्य कार्यालयावर एनआयए, एटीएस , जीएसटी आणि इतरही काही तपास यंत्रणांनी छापे टाकलेत. या छाप्यात पीएसआयच्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आलंय. त्याचबरोबर नाशिकमधे दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. पीएसआयचं महाराष्ट्र मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे.
Discussion about this post