व्हीएसआरएस मराठी न्युज -ध्वनिप्रदूषणाला कारणीभूत ठरणारा आणि बऱयाचदा विनाकारण वाजवल्या जाणाऱया हॉर्नचा आवाज शनिवारी संध्याकाळी दोन तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवायचा आहे. वाहतूक पोलिसांनी 5 ते 7 या वेळेत मुंबईमध्ये ‘नो हॉर्न’ हा विशेष ड्राइव्ह घेतला असून त्याची सर्वांनी अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ध्वनिप्रदूषणाविरोधात जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी ‘नो हॉर्न’ ही विशेष मोहिम हाती घेतली आहे. संध्याकाळी 5 ते 7 या दोन तासांदरम्यान कोणीही हॉर्न वाजवायचा नाही, असे आवाहन मुंबईकरांना करण्यात आले आहे. या मोहिमेची अंमलबजावणी व्हावी यासाठी शहरात ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहेत. शिवाय हॉर्न वाजवताना कोणी सापडला तर संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. ‘नो हार्न’बाबत जनजागृती आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरिता ही सुरुवात असल्याचे सांगण्यात आले.
वाहतूक पोलिसांनी हॉर्नमुळे होणाऱया ध्वनिप्रदूषणाविरोधात खास मोहीम हाती घेतली आहे. शनिवारपासून ‘नो हॉर्न’बाबत जनजागृती व अंमलबजावणीची आपण सुरुवात करत आहोत. पुढेदेखील ही मोहीम सुरूच राहील. जनतेकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
– राजतिलक रोशन, उपायुक्त (वाहतूक)
Discussion about this post