पिंपरी | (व्हीएसआरएस न्यूज) | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहरात कॉपीचा एकही प्रकार घडला नाही.
राज्यात दहावीच्या परीक्षेत 113, तर बारावीच्या परीक्षेत 260 अशी एकूण 373 कॉपीची प्रकरणे आढळली. तसेच प्रश्नपत्रिकांमधील चुका, पेपरफुटीची प्रकरणे, कॉपीची प्रकरणे यांचा समावेश आहे. या प्रकरणांत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात एकही कॉपीचा प्रकार घडला नाही. शहरात 46 केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली. खासगी व महापालिकेच्या शाळेतील एकूण 33 हजार 587 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली.
शहरातील एकाही केंद्रावर कॉपीचा प्रकार घडू नये, यासाठी (PCMC) महापालिकेच्या शिक्षण विभागाने उत्तम नियोजन केले होते. त्यानुसार पेपरच्या दिवशी 5 जणांची दोन फिरती पथकेही नेमण्यात आली होती. त्यामुळेच कॉपी मुक्त अभियान यशस्वी झाले आहे.
Discussion about this post