व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड शहरातील एका गोदामाला भीषण आग लागली.ही घटना रात्री उशिरा घडली.घटनेनंतर अग्निशमन विभागाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून तासाभराच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
चिंचवड कासारवाडी परिसरात जुने टायर आणि भंगाराचे गोदाम होते. या गोदामाला रात्री उशिरा भीषण आग लागली, टायर व भंगाराचे साहित्य असल्याने आगीने भीषण रूप धारण केले व शेजारीच एक रुग्णालय असल्याने आगीच्या ज्वाळांमध्ये वाढ होऊन मोठा धोका निर्माण झाला. रुग्णालयाच्या तळमजल्यावर ऑक्सिजनचे सिलिंडर पडलेले होते, तसेच डिझेलने भरलेला टाईम उभा होता, मात्र अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
19 रुग्णांना तातडीने रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले.
Discussion about this post