व्हीएसआरएस मराठी न्युज । १४ जून रोजी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पणाकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देहू दौरा निश्चित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे मोदी यांच्या दौऱ्याची जबाबदारी दिली असून हर्षवर्धन पाटील यांच्याकडून दौऱ्याचे नियोजन सुरू आहे.
पाटील यांनी देहू येथे जाऊन पाहणी केली असून त्यांनी तातडीने एक नियोजनाची बैठक घेतली. यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे ,श्री संत तुकाराम महाराज संस्थेचे विश्वस्त व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
वारकरी संप्रदायासाठी हा ऐतिहासिक क्षण असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू येथे पहिल्यांदाच येत असून त्यांच्या दौर्याची जोरदार तयारी सुरू असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
देहू:-श्री क्षेत्र देहू येथे तुकाराम महाराजांचे स्मरणीय शिळा मंदिर साकारण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या मंदिराचा लोकपर्ण सोहळा येत्या १४ जून रोजी होणार आहे. या अभूतपूर्व व ऐतिहासिक सभारंभाच्या सभामंडपाचे भूमिपूजन शांतिब्रम्ह ह.भ. प.मारुती बाबा कु-हेकर, गोविंद गिरी महाराज ,देहू संस्थांचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आणि लेफ्टनंट कर्नल भुपेंद्र सागी यांच्याहस्ते झाले.
लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास महाराष्ट्रातील वारकरी, दिंड्या उपस्थित राहणार आहेत. जवळपास ३०- ४० हजार जणांचा समुदाय कार्यक्रमास येणार असल्याचे विश्वस्त संजय महाराज मोरे यांनी सांगितलं आहे.
Discussion about this post