व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे- वरिष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर (वय 44) यांचे बुधवारी रहात्या घरी निधन झाले. चांदोरकर यांच्या अचानक निधन झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे.त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात्य एक बहिण असा परिवार आहे.’सांजसमाचार”प्रभात ‘ पासून चांदोरकर यांनी पत्रकारितेली सुरवात केली. त्यानंतर ते ‘केसरी’ सकाळ च्या साम सह हैदराबाद येथे ‘ई टीव्ही’मध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये पत्रकारिता केली ‘सामना’च्या मुंबई आवृत्तीही त्यांनी काम केले. पुण्यामध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ते उपसंपादक म्हणून रुजू झाले. ‘सकाळ’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दोन्ही दैनिकांमध्ये वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीवरचे लेखन प्रसिद्ध झाले. त्याला खवैयांनी मोठा प्रतिसाद दिला.
Discussion about this post