व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुण्यात CNG च्या दरात पुन्हा एकदा 4 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, आता प्रती लिटर CNG साठी पुणेकरांना 91 रुपये मोजावे लागणार आहेत. आज (सोमवार) पासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत.
ऐन सणासुदीच्या काळात ही वाढ झाल्याने नागरिकांना धक्का मिळाला आहे.मागच्या तीन महिन्यांचा विचार करता पुण्यात सीएनजी एकूण 6 रुपयांनी महागलाय.
मुंबईतील नागरिकांना पेट्रोलसाठी 106.31 रुपये आणि डिझेलसाठी 94.27 रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहेत. दुसरीकडे कोलकात्यामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दर आहेत. दरम्यान, RBI ने व्याजदरात वाढ केल्याने EMI आणि कर्ज वाढले आहे. थोडक्यात, महागाईमुळे अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.
Discussion about this post