व्हीएसआरएस मराठी न्युज -काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्य न्यायमंत्री तसंच माजी राज्यसभा खासदार ज्येष्ठ समाजवादी नेते हुसेन मिस्त्रिखान दलवाई यांचं निधन झालं आहे. ते 99 वर्षांचे होते.
मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हुसेन दलवाई यांच्या निधनामुळे काँग्रेसच्या गोटातून शोक व्यक्त केला जात आहे. हुसेन दलवाई हे चिपळूण शहरातील मिरजोळी गावचे रहिवाली होते. चिपळूणमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मुंबईत त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.
त्यानंतर ते काही काळ मुंबई हायकोर्टात वकिली देखील केली होती. त्यानंतर त्यांनी खेडमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. खेड तालुक्यातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती, या निवडणुकीत ते विजयी झाले होते. काँग्रेसकडून त्यांना दोन वेळा राज्यसभेची खासदारकी मिळाली होती.
तसंच त्यांनी काँग्रेसकडून राज्यमंत्रिपदही भुषवलं होतं. अस्खलित मराठी बोलणारे, संस्कृत, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर विद्वत्तापूर्ण प्रभूत्त्व असणारे दलवाई हे पहाता क्षणी त्यांच्याबद्दल आदर निर्माण होईल असे व्यक्तिमत्त्व होते. ते अत्यंत उत्साहाने आणि प्रसन्न चेहऱ्याने सामान्य माणसांच्या भेटीगाठी घेत असत. गेली सुमारे वीसबावीस वर्षे ते राजकारणापासून दूर होते.
Discussion about this post