व्हीएसआरएस मराठी न्युज –स्टील मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांचे सोमवारी रात्री जमशेदपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती टाटा स्टीलकडून देण्यात आली आहे.
ते ८५ वर्षांचे होते. इराणी चार दशकांहून अधिक काळ टाटा स्टीलशी जोडले गेले होते. ते टाटा स्टीलच्या संचालक मंडळातून जून २०११ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी तब्बल ४३ वर्षे टाटा स्टीलला सेवा दिली. त्यांनी टाटा स्टील कंपनीला विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळवून दिला.
१९८१ मध्ये ते टाटा स्टीलच्या बोर्डात रुजू झाले होते आणि २००१ पासून ते पुढे एक दशकभर ते बिगर-कार्यकारी संचालक होते. टाटा स्टील आणि टाटा सन्स व्यतिरिक्त डॉ. इराणी यांनी टाटा मोटर्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेससह अनेक टाटा समूह कंपन्यांचे संचालक म्हणून काम केले. इराणी यांच्या पश्चात त्यांची पत्नी डेझी इराणी आणि त्यांची तीन मुले झुबिन, निलोफर आणि तानाज असा परिवार आहे.
Discussion about this post